Testimonials
वाईची सहल.
गोवा,मुंबई, वस ई, ठाणे,पुणे
कुठून कुठून सारे जमले
त्रिगुणच्या साथीने
सहलीला निघाले.
छोटीशी वाईची सहल
पण खूप मजा आली
आंबा महोत्सवामुळे
सगळ्यांची चंगळ झाली
पहिल्या दिवशी धोम धरण पाहिले
बोटिंग करता करता,
निसर्गाचे सान्निध्य अनुभवले.
रात्री गाण्यांच्या कार्यक्रमात
सारे रंगून गेले.
शेंडेचा वाढदिवस साजरा झाल्याने
आपुलकीने सारेच आणखी जवळ आले.
फुग्यांच्या गेममध्ये हसून पुरेवाट झाली
खेळता खेळता सार्यांची वयं विसरली.
दुसर्या दिवशी नाना फडणवीसांचा वाडा पाहिला
गाईडने सांगितलेल्या ऐतिहासिक
गोष्टी ऐकून अंगावर काटा आला.
वाईच्या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेऊन
कृष्णामाईला भेटलॊ
येतायेताच तळघरातल्या शंकराचे
पण दर्शन घेऊन आलो.
संध्याकाळी भवानीमातेच्या
दर्शनाने पावन झालो.
दोन्ही दिवशी छान छान गेम खेळलो.
खेळताना लहानापेक्षा लहान झालो.
आंब्याचे अनेक प्रकार खाऊन तृप्त झालो.
आमराई,कांद्याचं शेत,केळीची बाग पाहिली
ताजीकेळी, कैरी, ऊसाची चव घेतली.
छोट्याशा टूरमध्ये खूप खूप मजा केली
दोन दिवसांची सहल फारच लवकर संपली.
प्रवीण आणि परागने टूर यशस्वी केली सगळ्या प्रवाशांची मनं त्यांनी जिंकली.
श्रीगणपतीची प्रार्थना करूया
अशाच टूरमध्ये परत आपण भेटूया.
सौ.स्नेहल निजसुरे.
मुक्काम पोस्ट मुरबाड विसावा….
मैत्रिणींची निघाली टोळी,
निमित्त साधले,महिला दिनी,
किती मुली, एक दोन तीन चार,
छे छे, तब्बल चारावर चार चव्वेचाळ!!
सा रे ग म प ध नी,
गाडीत पसरले सप्त सुर,
ठरवलेच होते साऱ्यांनी,
दे दणादण, करायची मजा भरपूर!!
निसर्ग रम्य, शांत सुंदर, सरळ परिसर,
साधे आचरण, मना भावले नितळ वर्तन,
तिथे लाभले जे समाधान, त्याचं कसं करू वर्णन,
Dr. म्हसकरांच्या आगमनाने, झाले भगवंताचे दर्शन!!
आदरातिथ्य छान केले,
चहा च्या चवीने, प्रफुल्लित झाले,
इडली चटणी कांदा पोहे,
झाले फस्त, उदर भरण नोहे!!
रंगबिरंगी फुलं दिसती गोड,
गुलाबाच्या बागेला नाही तोड.
सुंदर पऱ्या बागेत पसरल्या,
थोड्या शा उन्हात, सोनेरी भासल्या!!
निघाल्या सख्या मौज करायला,
निळसर पाण्यात, डुबकी मारायला.
गप्पा हशा बडबड, छान वाटे कानाला,
भिजऱ्या सख्या समाधानी, दिसत होत्या नजरेला!!
पाण्याचे तुषार, धबधब्याची धार,
अंगावर घेऊन, सुंदरा, नाचत होत्या फार,
विरंगुळ्याचे क्षण थोडे, सर्वांनी इथे टिपले चार,
लय भारी, ती दुपार झाली शानदार!!
दुपारचे जेवण, स्वादिष्ट भोजन,
भरली भेंडी, लोंच्याचे चाटण,
चिकन चपाती, जिलबी ताक, वरण भात,
मनसोक्त आम्हीं घेतला स्वाद!!
भोंडला, मेहंदी, फुगड्या, झिम्मा,
जुने दिवस आठवले,
त्या छोट्या अवधीत,
सगळेच अगदीं बालपण जगले!!
छोटीशी ही सहल आमची,
झाली अगदीं मजेदार,
निघाले सारे, आपापल्या घरी,
घेऊन आठवणी बहारदार!!
सुल्सुधा
आमची बेटावरील सहल.
८ मार्च २०२३-आंतरराष्ट्रीय महिला दिन.
जानेवारी महिन्यापासून च आम्हांला वेध लागले बेटावरील सहलीचे.
ग्रुप एकत्र करायची जमवाजमव सुरु झाली.
त्रिगुण ट्रॅव्हल्स चे सर्वेसर्वा श्री. प्रविण सरांना संपर्क साधून सगळ्या माहितीची देवाणघेवाण झाली आणि आम्हां मुलींची ( अजून आम्ही मनाने तरुण आहोत) तयारी सुरु झाली.
अखेर ८ मार्चला सकाळी ६ वाजता आमच्या सहलीला सुरुवात झाली. आमच्या दिमतीला प्रविण सरांनी सुंदर वातानुकूलित, आरामदायी बसची सोय केलीच आणि त्याचबरोबर आपले आपुलकीचे एक उमदे, हसतमुख ,काळजी घेणारे, मदत करणारे असे व्यक्तिमत्व श्री. पराग यांच्या रुपात आमच्या सोबत टूर लीडर म्हणून दिले.
दरमजल करीत एक एक जणींना घेत आम्ही निघालो.
नंतर ओळख परेड ( औपचारिक) झाली. रुचकर पोहे आणि कोथिंबीर वडीचा नाश्ता झाला.
तत्पूर्वी काही गाणी, भजने झाली आणि मंगलमय, आनंदी वातावरण निर्माण झाले.
थोड्या वेळात चहाकरिता सुमन हॉटेल येथे थांबलो. महाड जवळील जेट्टीला पोहोचलो आणि तिथून स्पीड बोटीने मस्त निसर्गाचा आणि पाण्याचा आनंद लुटत नयनरम्य, स्वप्नवत् बेटावर पोहोचलो.
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आमच्या सगळ्यांचे सामान श्री. पराग आणि त्यांची टीम यांनी सतत उचलून आम्हांला सहलीचा आनंद मनमोकळेपणाने लुटू दिला.
आपापल्या खोल्यांवर सामान पोहोचले. बेटावरील पाटील कुटुंबियाने कोकम सरबत देऊन आमचे स्वागत केले आणि नंतर सुग्रास जेवणावर ताव मारायला कधी सुरुवात केली ते कळलेच नाही. अहाहा! काय सुंदर, गरमागरम, प्रेमाने वाढलेले रुचकर पदार्थ ज्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. सुरमई फ्राय, तांदळाच्या भाकरी, सोलकढी( उत्कृष्ट चव), वालाचे बिरडे,बटाटा भाजी, पापड, दुधी हलवा इ. पदार्थांची रेलचेल असलेले ते जेवण करुन आम्ही पत्त्यांचे डाव रंगवले.
बेट अतिशय सुंदर, रमणीय आहे. त्यानंतर श्री. पराग यांनी ( प्रविण सरांच्या निर्देशानुसार) आम्हांला सरप्राईज द्यायला सुरुवात केली. महिला दिनानिमित्त सगळ्या मुलींना ( महिलांना) हातावर मेहेंदी काढायला दिली. छान, आकर्षक छोटेखानी सजावट करुन तेथे मेंदीचा कार्यक्रम रंगला.
नंतर मगर सफारी करायला बोटीतून फेरफटका मारुन आलो.
चहा आणि गरमागरम भजी खात आम्ही स्विमिंग पूलावर पोहोचलो. तेथे मनमुराद पोहत, भाजीचा आस्वाद घेत संध्याकाळ कधी उलटली ते कळलेच नाही.
संध्याकाळी तयार होऊन मस्त खेळ खेळण्याकरीता मुली तयार झाल्या. श्री. पराग आणि टीमने रींगचा खेळ, त्यानंतर हनुमान- कृष्णाचा खेळ, भरपूर नाचगाणी, फुग्याचा खेळ, वैयक्तिक मनोरंजन सादरीकरण ( आम्ही मुलींनी सादर केलेले) झाले आणि आमची संध्याकाळ रात्रीच्या जेवणावर कधी येऊन पोहोचली ते कळलेच नाही.
रात्री परत दिलेले रुचकर जेवण जेवून आत्मा तृप्त होतो न् होतो तोच त्रिगुण ट्रॅव्हल तर्फे अजून एक सरप्राईज समोर आले.
वुमेन्स डे स्पेशल केक पासून आदरातिथ्य कुठेही कमी पडले नाही याची जाणीव आणि आम्हांला दिलेला सन्मान याने मन अजून आनंदीत झाले.
अखेर पत्त्यांचा डाव रंगवून तृप्त मनाने महिला दिन साजरा करुन स्वप्नतारकांवर कधी पोहोचलो ( झोपलो) ते कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता बेटावरील प्रभातफेरी झाली. मनोहारी सूर्योदय, पक्षांचे किलबिलाट ऐकून प्रभात फेरी सार्थकी लागली.
चहा, पोहे, मिसळ पाव अशा दमदमीत नाश्ता आणि फोटो सेशन्स झाले
आणि परतीच्या प्रवासाची तयारी सुरु झाली.
जड अंत:करणाने बेटावरील टीमने आम्हांला निरोप दिला आणि स्पीड बोटी तून परतीच्या प्रवासाला लागलो.
बसमध्ये हाऊजी गेम खेळलो आणि दीक्षित भोजनालय, जांभुळपाडा इथे रुचकर जेवण करुन, तेथील पापड वगैरे पदार्थ खरेदी करुन घराकडे परत यायला निघालो.
श्री. पराग यांना मनापासून सगळ्यांकडून धन्यवाद. त्यांनी प्रत्येकीला केलेली मदत, आपुलकीने दिलेला मदतीचा हात, न कंटाळता आम्हाला दिलेली प्रत्येक गोष्ट, हसतमुखाने आणि आनंदी मनाने, उत्साहाने आम्हाला लहान मुलांसारखे दिलेले प्रेम वाखाणण्याजोगे आहे.
त्याचप्रमाणे इतर सगळ्यांनी आमची केलेली खातिरदारी प्रशंसनीय.
त्याचबरोबर जे backstage ला असलेले मदतनीस, आम्हांला पण काही ना काही रुपात ज्यानी मदत केली त्यांचे आम्ही ऋणी आहोतच.
आणि आता कळसाध्याय म्हणजे आपले सर्वेसर्वा श्री. प्रविण सर ज्यांनी त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांना इतके सुंदर घडविले आहे त्यामुळे च आपली सहल अतिशय अविस्मरणीय झाली. प्रविण सर शतशः नमन!
पुढील सहली आपल्याबरोबर जरुर करु.
धन्यवाद🙏🙏
Mrs. Leena Kulkarni
नमस्कार
ज्याची सर्व सभासद आतुरतेने वाट बघत असतात, तो सोबतीचा आनंद मेळावा, स्नेह रिसॉर्ट,कासारसाई धरण येथे १-२ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आला.
त्याआधी TTT,चे श्री प्रविण डाखवे यांच्याशी कार्यकारीणी च्या सभासदांनी चर्चा करून जागा, दिवस, वेळ वगैरे निश्चित केले.ह्यावेळी बऱ्याच वर्षांनंतर दोन दिवसांची सहल आयोजित केली.
सभासदांनी उदंड प्रतिसाद दिला व लवकरच सहल हाऊस फुल्ल झाली.
३० सदस्यांनी नावे नोंदविली.
नियोजित दिवशी, सर्व सभासद अगदी वेळेत हजर झाल्याने, बस ला बैनर लावून, हार घालून, नारळ वाढवून बरोबर ६.३० वाजता उत्कर्ष मंडळ येथून बस सुटली.
बस मधे भजन, गाणी,जोक्स वगैरे यात सहलीचे ठिकाण कधी आले, कळलेच नाही.
सर्वांनी बसमधेच गरमागरम packed नाश्ता,उपमा व कोथिंबीर वड्या याचा आस्वाद घेतला.
नंतर संपूर्ण परिसराचा फेरफटका मारला.Lovers Paradise असेच त्या भागाचे नाव असल्याने तेथे विविध आकर्षक पुतळे,रंगीत छत्र्या वगैरे होते.सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे ढगांतून वरखाली जाणारा चंद्र…
सर्वांनी त्यावर बसून फोटो काढले.गुफांतून कलात्मक मूर्त्या,कुठे बरसणारे पाणी, असे सगळे खूप छान होते.
जादूच्या खेळांचा एक छोटा कार्यक्रम होता ,तो सर्वांनी खूपच enjoy केला.
नंतर स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
दोन तासांच्या विश्रांती नंतर धरणाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या lake वर गेलो.
तेथे सर्वांनी बोटींग केले. त्याआधी सर्वांनी लहानश्या झुकझुक गाडीतून परिसराचा चक्कर मारला.ज्या ज्येष्ठ सभासदांना चालणे अवघड होते, त्यांना आयोजकांचे सहाय्यक खूप मदत करत होते.
मग रिसॉर्ट येथील शेती वनौषधी बघुन, झुल्यांवर बसून सगळे अगदी आपले वय विसरले. त्यानंतर गरमागरम चहा व सोबत खुसखुशीत नाश्ता घेतला. नंतर गाण्याचा कार्यक्रम होता.मधे आपल्या काही सभासदांनी पण गाणी,गोष्टी सादर केल्या.मग दोन खेळ घेण्यात आले.सर्व सभासद त्यात सहभागी झाले.
मग मस्त जेवण घेऊन पुन्हा lawn वर गप्पां रंगल्या.
दुसऱ्या दिवशी इडली,उपमा,मिसळपाव असा नाश्ता करून संत दर्शन हे museum बघायला निघालो.
तेथील भव्य,सजीव मुर्त्या अगदी अचंभित करणाऱ्या होत्या.भोजन करून,तेथील विठ्ठल रखूमाई च्या मंदिरात दर्शन घेऊन
सर्व परतीच्या प्रवासाला निघाले ते
नेहमी पेक्षा वेगळे ठिकाण ,सुग्रास भोजन, सर्व सुविधांनी सुसज्ज खोल्या ,सुंदर परिसर वगैरे च्या सुखद आठवणी घेऊन च.
दोन्ही वेळा प्रवासात फारसा ट्राफिक न लागल्याने प्रवास पण सुखकर झाला. परतीच्या प्रवासात हाऊझी खेळ घेण्यात आला व विजेत्यांना आयोजकांकडून बक्षिसे दिली गेली.
नेहमी प्रमाणे बस मधे कचोरी,चॉकलेट,गोळ्यां ची अगदी रेलचेल होती हे वेगळे सांगायला नकोच.
अश्या प्रकारे ,दोन दिवसांची ही सहल,सगळ्यांच्या सहकार्याने अगदी अविस्मरणीय ठरली.
धन्यवाद🙏
Sant Darshan Tour